निसर्ग, पृथ्वी स्वत:ला दुरुस्त करत आहे, होय प्रकृती स्वतःला रिबूट करत आहे | निसर्ग स्वतःला सावरत आहे निबंध.
नमस्कार...............................
निसर्ग, पृथ्वी स्वत:ला दुरुस्त करत आहे, होय प्रकृती स्वतःला रिबूट करत आहे........
ओड़िशाच्या बिचवर लॉकडाउन असल्यामुळे कोणतेच पर्यटक नाहीत , त्यामुळे एक दोन नव्हेत तर चक्क ८ लाखाच्यावर कासव तिथे अंडी घालायला आलेत आणि एक कासव जवळपास १०० च्यावर अंडी देत असतो त्यामुळे 'Endangered Species' म्हणजेच लुप्त होत चाललेली प्रजाति 'Olive Riddle Turtle' चे जवळपास एक कोटीपेक्षाही जास्त पिल्ले जन्माला येणार आहेत आणि ती प्रजाति लुप्त होण्यापासून वाचणार आहे .
गंगा नदीच पाणी शुद्ध होतय , हो , कारखाने लॉकडाऊनमुळे बंद आहेत आणि त्या कारखान्याचे दूषित पानी गंगेत मिसळत नसल्यामुळे , ती शुद्ध होते आहे .
हिमाचल प्रदेशात असणारे पहाड़ हे तिथुन जवळपास २९० ते ३०० कि.मी. दूर हरियाणाच्या प्रदेशातून सहज़ दिसायला लागलेत , जे प्रदुषणामुळे दिसत नव्हते .
ओझोनचा कवचाचे जिथे छिद्र पडत आहे , असे ऐकायला नेहमी येत होते , ते ओझोन कवच आता स्वतःत सुधारणा घडवत आहे .
मानवी वर्दळीमुळे पृथ्वीची कंपने जी वाढली होती , ती आता २० ते ३० टक्क्यांनी कमी झाली आहेत .
मुंबई,दिल्लीचे प्रदुषण घटत आहे .
समुद्र किनारी जंगली श्वापद हिंडताना पहायला मिळत आहेत , जो योग फारच क़्वचित झाला असेल .
एकंदरीतच बघायला गेलो तर निसर्ग स्वतःला दुरुस्त करुन घेत आहे , असेच म्हणावे लागेल. तसे आमच्या प्रोफेसरांनी आम्हाला सांगितले होते एकदा की , मानवाला काहीच करायची गरज नाही , निसर्गाला त्यांच्या कुवतीवर सोडून द्यावे , त्याच्यामध्ये एवढी ताकत आहे की , तो स्वतःची काळजी घेऊ शकतो .
आणि बघा आज त्यांचे शब्द खरे ठरले.......
कोरोनाची भिती आहेच , त्यामुळे मृत्युंचा आकड़ा वाढत आहे , पण तुलना करता तर रोज रस्त्यावरील अपघात आणि इतर अनेक कारणामुळे होणारे मृत्युचा आकड़ा जो आज थांबलेला आहे ,जो कोरोनाच्या आकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असता .
म्हणून सरकार म्हणत आहे की "घरी रहा" त्यांचे तर ऐकाच पण या निसर्गाचे सुद्धा ऐका आणि "घरी रहा", आपण याबाबत गंभीर आजारी झालो की , हाँस्पीटलमध्ये एडमिट करुन आपल्याला विश्रांती घ्यायला सांगतात ना , तशीच आता निसर्गाला विश्रांतीची गरज आहे , त्याला विश्रांती घेऊ द्यावी .
पुढे शुद्ध वातावरण , निसर्ग आपली वाट पाहतो आहे .
त्याचा आस्वाद घ्यायचे ना मग "घरी थांबावे" ही निसर्गाची हाक आहे... संपूर्ण मानव जातीला....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Stay home stay safe
🙏🙏🙏काळजी घ्या🙏🙏🙏
Post a Comment