पृथ्वीवर कलियुग संपून "सतयुग" आले की काय ?

पृथ्वीवर कलियुग संपून "सतयुग" आले की काय ?


पृथ्वीवर कलियुग संपून "सतयुग" आले की काय ?

1- नाही रविवार संपण्याची चिंता.
2- नाही सोमवार उजाडण्याची भिती.
3- नाही पैसे कमावण्याची लालसा.
4- नाही खर्च करण्याची धडपड.
5- नाही हाॅटेलात जेवण्याची इच्छा.
6- नाही फिरायला जाण्याची भावना.
7- नाही सोने चांदी खरेदीचा मोह.
8- नाही नवे कपडे घालण्याची उत्सुकता. नाही चांगले नटण्या थाटण्याची अभिलाषा...

सगळेजण मोक्षाच्या व्दारावर पोहचलो की काय.????
असं वाटतय कलियुग संपून सतयुग आलं आहे.


▪परीवारासह पुजाआर्च्या, उपवास, रामायण, महाभारत.
▪वातावरण स्वच्छ, निरोगी. जणू प्रदूषण झाले समाप्त.
▪धावपळीचं जीवन संपले.
▪सगळ्यांचे जगणे झाले धीरगंभीर.
▪सगळे झाले शाकाहारी. खात आहेत दाल रोटी.
▪सगळेच आलेत एका पातळीवर. जो न्याय राष्ट्रपती, उद्योगपतींना तोच न्याय गावातील जनसामान्यांना. घरात बंद..
▪कोणीही नोकर नाही. घरात सगळे मिळून काम करताहेत.
▪कोणी दागदागिने घालून मिरवत नाही, कोणी महागडे कपडे घालून रुबाब दाखवत नाही.
▪सगळेच दान धर्म करण्याची भाषा बोलतात आणि देवच आता तारणहार म्हणत प्रार्थना करण्यात मग्न.
▪आणि हो 'अहंकार' शांत झाला हे मोठे फलित.
▪लोक एकमेकांना सहकार्य करण्याची भाषा बोलू लागलेत.
▪घर, गावं सोडून नगरवाशी झालेली मुलं आपल्या वृध्द आई वडीलांच्या जवळ येऊन राहात आहेत.
 ▪घरोघरी भजनाचा नाद घुमू लागला आहे.

हे सतयुग नाही तर काय आहे.?


परमेश्वरा कोरोना वायरस लवकर संपूदे. पण माणसातला हा बदल कायम राहूदे.

एवढी प्रार्थना मानून घे देवा.


🙏🙏🙏🙏🙏

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post